sakhe chehara tuzha mogarya sarakha
!! सखे चेहरा तुझा मोगऱ्या सारखा!!
तुझ्या भोवती फिरे भोवरा सारखा ,
सखे चेहरा तुझा मोगऱ्यासारखा ||२||
रूप संपदा तुझी बघ ही जाईल लूटून
गाव आहे टपून माजूऱ्यासारखा,
सखे चेहरा तुझा मोगऱ्यासारखा ||२||
संधी साधून बदनाम करतील ग.
मित्र त्या जाळीला निखार्यासारखा
सखे चेहरा तुझा मोगऱ्यासारखा||२||
कावळ्या परी तो बसतो टक लावूनी
जाळे प्रीतीचे टाकी शिकाऱ्यासारखा
सखे चेहरा तुझा मोगऱ्यासारखा||२||